
चिपळूण तालुक्यातील पीएम किसान योजनेपासून ३ हजार ४४१ शेतकरी वंचित राहण्याची शक्यता.
शासनाने सूचनां करूनही ऍग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अद्याप न काढून घेतल्याने चिपळूण तालुक्यातील ३ हजार ४४१ शेतकरी पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्यापासून वंचित राहाणार आहेत. हा हप्ता दि. २० जून रोजी वितरित होणार असून तो केवळ फार्मर आयडी असलेल्यांनाच मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार, ज्या शेतकर्यांच्या नानावर शेतजमीन आहे अशा सर्व शेतजमीन धारकांना ऍग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) मिळवणे आवश्यक आहे. यामुळे शेतकर्यांना सर्व कृषि योजनांचा लाभ मिळण्यात सुलभता येणार आहे. शासनाच्या दि. ११ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार, फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले असून, कृषिच्या कोणत्याही योजनेचा लाभ फार्मर आयडी शिवाय मिळणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता येत्या २० जून २०२५ रोजी वितरित होणार असून, हा हप्ता केवळ ज्या शेतकर्यांनी फार्मर आयडी काढला आहे, त्याच शेतकर्यांना मिळणार आहे.www.konkantoday.com