ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘मविआ’च्या भावी मुख्यमंत्र्यांची घोषणा! ‘अवघ्या दीड-दोन महिन्यात…’
मुंबई – मुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे भाषण सुरु झाले. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात करताना महाविकास आघाडीच्या भावी मुख्यमंत्र्यांची घोषणा केली.*भाषण सुरु करताना भास्कर जाधव म्हणाले, छत्रपती शिवराय, हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि अवघ्या दीड दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राचे होणारे भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, असा उल्लेख भास्कर जाधव यांनी केला. व्यासपीठावरील नेत्यांचा उल्लेख करताना त्यांनी हे वक्तव्य केले.दरम्यान, अनेकदा मविआतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी मविआच्या नेत्यांकडे केली. मात्र मविआतील राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार तसेच काॅंग्रेस नेत्यांनीही त्यांच्या या मागणीला नकार दिला. निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे संकेत शरद पवार यांनी दिले. मात्र आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे.