
सावर्डे-दहिवली येथे सावर्डेत एटीएसची धाड, सहाजण ताब्यात.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे-दहिवली येथे बुधवारी सायंकाळी उशिरा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून सहाजणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कर्नाटक राज्यातून चोरट्या मार्गाने आणलेले सुमारे १० लाख रुपयांचे खैराचे लाकूड एका ठिकाणी बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याप्रकरणी सावर्डे येथील मुआज रियाज पाटणकर याच्यासह इतर पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका सशियाताचा संबंध हा दहशतवादी संघटनेसोबत काम करणार्या व्यक्तीशी असून खैराच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेला पैसा हा दहशतवादी कृत्यासाठी वापरला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणात वसीम अख्तर मुक्तार अहम मोमीन (७८, इस्लामपूर मस्जीद जवळ, इस्लामपूर, भिवंडी-ठाणे), असिफ रशिद शेख (नगरसूल, नाशिक), फारूख शेरखान पठाण (येवला रोड, नाशिक). www.konkantoday.com