रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऑनलाईन भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऑनलाईन भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण झाली आहे. उमेदवारांना पुन्हा परीक्षेसाठी यावे लागल्याने त्यांना प्रत्येकी ५०० रुपये प्रवास खर्च देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.भरती प्रक्रिया घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल-खेड, राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी आंबव-देवरूख, विप्रोज टेक सेंटर खेर्डी-चिपळूण, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ बोरज-खेड या केंद्रावर तीन सत्रामध्ये घेण्याचे बँकेने ठरविले होते. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षा देण्यासाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांनी प्रवास खर्चाची रक्कम मिळण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा बँकेने उमेदवारांना प्रवास खर्चापोटी प्रत्येकी ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. www.konkantoday.com