मुख्यमंत्री रोजगार हमी योजना खाद्यपदार्थ विक्री वाहनांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण
. रत्नागिरी, दि. ११ – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फूड ऑन व्हिल- फिरते खाद्यपदार्थ विक्री केंद्र प्रातिनिधीक स्वरुपात सहा लाभार्थ्यांना वाहनांची चावी प्रदान करण्यात आली.* लाभार्थ्यांना या व्यवसायासाठी २० लाख रुपयांपर्यंतच्या कमाल मर्यादेत बँकेमार्फत कर्ज प्रकल्प करता येते. या व्यवसायाला उद्योग विभागाकडून १५ ते ३५ टक्के एवढे अनुदान उपलब्ध होते. जिल्ह्यात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सीएमइजीपी या योजनेतंर्गत कोटक महिंद्रा बँकेने ५२ वाहनांचे कर्ज प्रकरण मंजूर केली आहेत. एकूण कर्ज मंजूर रक्कम ४ कोटी २ लाख एवढी आहे. त्यावर १ कोटी ३२ लाख इतके अनुदान मंजूर झाले आहे. आर्थिक वर्षात २४९ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. रोशन बोंबले, शुजात गुहागरकर, पंकज कारकर, सचिन रामगडे, प्रणित कुवेसकर, विकास वाडेकर अशा सहा प्रातिनिधीक लाभार्थ्यांची नावे आहेत. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, सरपंच फरिदा काझी, महिंद्रा कोटक बँकेचे योगेश करमरकर आदी उपस्थित होते.