खेड रेल्वे स्थानकाच्या नव्या शेडला गळती, फुटपाथला पडले भगदाड.
खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे काम अर्धवट असतानाच काल लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानकासमोरील फूटपाथला दोन तीन ठिकाणी मोठे भगदाड पडली आहेत.लोकार्पण कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने स्थानकात नव्याने बांधलेल्या शेडला गळती लागल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून ठेकेदाराची चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. www.konkantoday.com