कोकण मंडळाची यंदा केवळ १,३२२ घरांसाठी सोडत, आजपासून अर्ज विक्री-स्वीकृती!

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने सहा ते सात हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र कोकण मंडळाने गुरुवारी केवळ १,३२२ घरांसह ११७ भूखंडांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. घरांची संख्या खूप कमी असून यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेसह म्हाडाच्या कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश आहे. जाहिरातीनुसार आता शुक्रवार, ११ ऑक्टोबरपासून या घरांसह भूखंडांच्या विक्रीसाठीच्या अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून २७ डिसेंबर रोजी म्हाडाच्या मुख्यालयात सोडत काढण्यात येणार आहे.*आचारसंहितेच्या आधी म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांनी सोडत जाहीर कराव्या यासाठी राज्य सरकार आग्रही होते. सोडतीद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष करून मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीसाठी सरकार आग्रही होते. त्यानुसार नुकतीच मुंबई मंडळाच्या २,०३० घरांसाठीची सोडत काढण्यात आली. ही सोडत पार पडताच कोकण मंडळाने १,३२२ घरासंह ११७ भूखंडांच्या विक्रीसाठी गुरुवारी जाहिरात प्रसिद्ध केली. आचारसंहितेपूर्वी अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यासाठी कोकण मंडळाची धावपळ सुरू होती. त्यानुसार गुरुवारी १,३२२ घरांसह ११७ भूखंडांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान आतापर्यंत ६ ते ७ हजार घरांसाठी सोडत काढली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र केवळ १,३२२ घरांसाठीच सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेसह २० टक्के आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील रिक्त घरांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र ती घरे आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट करून त्यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण मंडळाची मूळ सोडत केवळ १,३२२ घरांसाठीच असणार आहे. या १,३२२ घरांसह ११७ भूखंडांच्या सोडतीसाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तर अनामत रकमेसह अर्ज सादर करण्यास दसऱ्याच्या दिवशी, शनिवारी १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.कोकण मंडळाच्या जाहिरातीनुसार १,३२२ घरांपैकी ५९४ घरे २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील आहेत. रोमा बिल्डर्स, भगवती स्पेस, सदगुरू डेव्हल्पर्स, स्वस्तिक रिलेटर्स, एकता रिलेटर्स यासह अन्य समुहाच्या प्रकल्पातील ही घरे आहेत. यापैकी सर्वाधिक घरे ठाणे जिल्ह्यातील आहेत. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील ही घरे असून या घरांच्या किंमती १३ लाख ते ३७ लाख दरम्यान आहेत. त्याचवेळी कोकण मंडळाच्या प्रकल्पातील विखुरलेली घरे योजनेतील ७२८ घरांचाही या सोडतीत समावेश आहे. कल्याणमधील चिकणघरमधील एक घर, शीवअंबे नगर, अंबरनाथमधील एक घर, बाळकुम ठाण्यातील एक घर, भंडार्ली, ठाणे येथील ४५ घरे, विरार-बोळींजमधील ३१ घरे, शिरढोणमधील ५२८ घरे आणि पत्रकारांसाठीची १२१ घरे अशी ही ७२८ घरे आहेत. अल्प आणि मध्यम गटातील ही घरे आहेत. या घरांच्या किंमती ११ लाख ते ६८ लाख रुपयांदरम्यान आहेत. एकूणच यंदा २० टक्क्यांतील ५९४ आणि कोकण मंडळाच्या योजनेतील ७२८ अशा एकूण १,३२२ घरांसाठीच सोडत काढण्यात येणार आहे.*सोडतीचे वेळापत्रक*नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकती – शुक्रवारी (११ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्रीची शेवटची मुदत – १० डिसेंबर रात्री ११.५० वाजेपर्यंतसंगणकीय पद्धतीने अनामत रकमेसह अर्ज स्वीकृतीस सुरुवात – १२ ऑक्टोबर दुपारी १२ वाजल्यापासूनसंगणकीय पद्धतीने अनामत रकमेसह अर्ज स्वीकृतीची शेवटची मुदत – ११ डिसेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंतआरटीजीएस वा एनईएफटीअंतर्गत अनामत रकमेसह अर्ज स्वीकृतीची शेवटची मुदत – ११ डिसेंबर बँकेच्या कार्यालयीन वेळेदरम्यान*सोडतीची तारीख – २७ डिसेंबर, सकाळी १० वाजता**सोडतीचे ठिकाण – म्हाडा भवन, वांद्रे पूर्व*११७ निवासी भूखंडांपैकी एक भूखंड रोह्यातील असून उर्वरित निवासी भूखंड सिंधुदुर्गमधील ओरस येथील आहेत. रोह्यातील भूखंड अल्प गटातील असून ओरसमधील भूखंड उच्च गटातील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button