
चिपळूण उड्डाणपुलाच्या उभारणीत येत आहेत सतत अडचणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळण बहाद्दूरशेख येथील उड्डणापुलाच्या कामामागे जणू साडेसातीच लागली आहे. पुलाचे काम सुरू झाल्यापासून विघ्नच विघ्न येत आहेत. आठ महिन्यांपूर्वी या पुलाचे गर्डर कोसळले, तर आता पिलर कटिंग सुरू असतानाच पिअर कॅपचा एक भाग व क्रेनचा रोप तुटून दोन कामगार जखमी झाले. त्यामुळे ठेकेदार कंपनी आणि संबंधित अधिकार्यांच्या कामाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. www.konkantoday.com