
एक तर ठेकेदार यांनी राजकारण करावे, नाहीतर ठेकेदारी करावी -आ. राजन साळवी.
लांजातील ठेकेदार राजकारणात उतरले आहेत. एक तर ठेकेदार यांनी राजकारण करावे, नाहीतर ठेकेदारी करावी ते राजन साळवी म्हणून मला ओळखत असतील, राजू साळवी साळवी म्हणून मला ओळखलेले नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. या ठेकेदारांची गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इसारा डॉ. आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षातील कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करीत असल्याने आणि तालुक्यातील विकास कामांचे श्रेय पालकमंत्री घेत असल्याने याबाबत पत्रकार परिषद घेवून विरोधकांचा समाचार घेताना आमदार राजन साळवी बोलत होते. पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत हे ठेकेदार, यांना बरोबर घेवून राजकीय महोल तयार करीत आहेत. ठेकेदार राजकारण करू लागले आहेत. त्यांना अद्याप राजन साळवी समजलेला नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या विरोधात जे कोणी असोत, त्यांना आम्ही सोडणार नाही. आज मनगटात तितकीच ताकद आहे. म्हणून ठेकेदार यांनी हुरळून जावू नये, एकतर राजकारण करा, नाहीतर ठेकेदारी. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शंभर टक्के येणार आहे. आघाडीला निर्विवाद बहुमत मिळेलच, असा ठाम विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.www.konkantoday.com