आडिवरे श्री महाकाली मंदिराजवळ ट्रकच्या धडकेत आई-मुलगा जखमी.
राजापूर तालुक्यातील आडिवरे श्री महाकाली मंदिराच्या पुढील रस्त्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आई व मुलगा गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सागर अमरनाथ मिरजुळकर (२८) व त्याची आई अक्षता अमरनाथ मिरजुळकर (४८, दोघेही रा. गावडे आंबेरे, खारवीवाडा, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.सागर मिरजुळकर हा १० ऑक्टोबर रोजी दुचाकीवर सोबत आई अक्षता हीस घेवून जैतापूर येथील दवाखान्यात जात होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आडिवरे मंदिराच्या पुढे रस्त्यावर आला असताना धारतळे येथून येणारा ट्रक (एमएच १० एडब्लू ७३०९) ने मिरजुळकर याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सागर व अक्षता दोघे जखमी झाले. यामध्ये सांगर गंभीर जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. www.konkantoday.com