
महायुतीत सगळं ऑल इज वेल – अजित पवार.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष पत्रकार परिषद घेणार असं म्हणत एकच खळबळ उडवून दिली होती. पण, या पत्रकार परिषदेत अजितदादांनी विशेष अशी काहीच घोषणा केली नाही.अजितदादांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांचा पक्षप्रवेश झाला आहे. तसंच, बारामतीतून जागा लढवणार असून ती जागा राष्ट्रवादीकडे आली तर राष्ट्रवादीच लढवणार आहे, पण अजून निर्णय झाला नाही, असंही अजितदादांनी ठामपणे सांगितलं. तसंच, महायुतीत सगळं ऑल इज वेल आहे, असंही दादा म्हणाले.अजित पवार संध्याकाळी 6.30 वाजता विशेष पत्रकार परिषद घेणार अशी घोषणा केली आणि राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून अजितदादा 10 मिनिटांमध्ये बाहेर पडले होते. त्यामुळे या पत्रकार परिषदेला मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं. पण अजितदादांनी कोणतीही अशी मोठी घोषणा केली नाही.मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये काही वाद झाला का?नाही बाबा, कुठलीही धुसफूस नाही. कोणताही वाद नाही. ऑल इज वेल आहे, असं म्हणत अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मतभेद असलेल्या चर्चांवर पडदा टाकला.