
दुचाकी घसरल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू.
मुंबईहून खेड तालुक्यातील खोपी येथे जाण्यासाठी आलेल्या प्रौढाचा तालुक्यातील ऐनवरे गावाजवळ दुचाकी (एमएच ०८ बी- ११३७) घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.सागर शाम खेडेकर (वय ५०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सागर खेडेकर हे छत्रपती शिवाजी हायस्कूल खोपी येथील शाळेत शिपाई पदावर कार्यरत होते. सागर खेडेकर हे सोमवार, दि. २ रोजी मुंबई येथून खेडमध्ये पहाटे उतरले होते. दुचाकी घेऊन ते खोपीकडे जाताना ऐनवरे गावाजवळ आल्यावर त्यांची दुचाकीघसरली. या अपघातात सागर गंभीर जखमी झाले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला