कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख

रत्नागिरी जिल्ह्यातील ७ संस्थांचे नामकरण_७ ऑक्टोबर,रत्नागिरी: कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ७ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.”नामकरण केलेल्या संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे,१. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, जि. रत्नागिरी- लोकमान्य बाल गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, जि.रत्नागिरी२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी, जि. रत्नागिरी- राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी, जि. रत्नागिरी३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड, जि. रत्नागिरी- क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड, जि. रत्नागिरी४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली, जि. रत्नागिरी- धोंडो केशव कर्वे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली, जि. रत्नागिरी५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंडणगड, जि. रत्नागिरी- नाना फडणवीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंडणगड, जि. रत्नागिरी६. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिपळूण, जि. रत्नागिरी- भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिपळूण, जि. रत्नागिरी७. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, जि. रत्नागिरी- माधवराव मुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, जि. रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button