
शासनादेश डावलल्याने शिक्षक संघटना आक्रमक.
शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुपून त्यांना अध्यापनापासून दूर ठेवले जाते. यामुळे मोठे शैक्षणिक नकसान होत असल्याबद्दल अनेक वर्षे शासनावर टीका होत आहे. यासाठी मागील महिन्यात शिक्षकांना दिल्या जात असलेल्या अशा कामांची यादी स्वतः शासनानेच तयार केली व शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचे आदेश जारी केले. मात्र हा शासनादेश नजरेआड करून निवडणुकीशी संबधित बीएलओ म्हणून कामासाठी वारंवार शिक्षकांनाच बजावण्यात येत आहे. या विरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून आता शिक्षक संघटनाही आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. www.konkantoday.com