महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे; पण मविआचं मुख्यमंत्रीपदाबाबत ठरेना, उमेदवाराबाबत संभ्रम कायम!
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केव्हाही जाहीर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत येऊन येथील निवडणुकांबाबत बैठका घेतल्या आहेत.*त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला असून बैठकीत तारखांबाबत मिळालेल्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. दरम्यान, राज्यात निवडणुकांचा वारे वाहू लागलेले असतानाही महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाबाबत काहीच निश्चित झाले नाहीय. मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन निवडणूक लढवायची की न देता लढवायची यावरूनच संभ्रम निर्माण