
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकोकण कोस्टल मॅरेथॉन तर्फे आवाहन नियोजित स्वागत रॅली मधील बदल
सर्वांना नम्र विनंती
कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आपले मित्र प्रसाद देवस्थळी यांच स्वागत आज संध्याकाळी ५ वाजता साळवी स्टॉप इथे नियोजित आहे.
काल अहमदाबाद इथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अनेक निष्पाप जीव गमावले गेले. या हृदयद्रावक घटनेमुळे आपल्या सर्वांच्या मनावर शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर, नियोजित जल्लोष व सत्कार समारंभात काही बदल करण्यात आले आहेत.कुठलाही जल्लोष न करता साळवी स्टॉप इथे प्रसाद देवस्थळी यांचे स्वागत करण्यात येईल. तसेच आपण आज कुठलीही स्वागत रॅली आज काढणार नहियोत.
नि:संकोच पणे कॉम्रेड मॅरेथॉन मधे मिळालेल यश हे कोकणासाठी आणी आपणा सर्व रत्नागिरीकरांसाठी ऐतिहासिक असेच आहे आणी या यशासाठी रत्नागिरीवासियाना साजेसा असा त्यानंतरचा सन्मान सोहळा आणि सत्कार कार्यक्रम पुढील काही दिवसांत योग्य वेळी आयोजित केला जाईल.आपण सर्वांनी या बदलाला समजून घेत सहवेदनेने साथ द्यावी.
आपल्यापैकी जे कोणी या रॅली साठी आरोग्य मंदिर,शिवाजी नगर , मारुती मंदिर इथे जमणार होते त्या सर्वानी संध्याकाळी ५ वाजता साळवी स्टॉप इथे उपस्थित रहावे ही विनंती.
आपले विनम्र,
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब
कोकण कोस्टल मॅरेथॉन
गणपतीपुळे अल्ट्रा परिवार