नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित.
विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) विश्वसनिय सूत्रांनी माहिती दिली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. ७) सोलापूर दौऱ्यावर होते आणि मंगळवारी सोलापुरात वनचपूर्ती सोहळा होणार असतानाही ते बैठकीसाठी पुन्हा मुंबईला परतले आहेत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगळवारी (ता. ८) सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता वचनपूर्ती सोहळा होणार आहे. कॅबिनेटची बैठक दुपारी चारनंतर होणार असल्याचे मंत्रालयातील विश्वसनिय सूत्रांनी बोलताना सांगित