
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे जगबुडी पुलावरून केमिकलचा टँकर दोनशे फूट नदीत कोसळला.
मुंबई-गोवा महामार्गावरील गेडमधील भरणे जगबुडी नदीच्या पुलावरून तब्बल दोनशे फूट दरीत केमिकलचा टँकर कोसळून अपघात झाला आहे. अपघात पहाटेच्या सुमारास झालेला आहे. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना भरणे येथील जगबुडी नदीच्या पुलाच्या सुरूवातीलाच दोन पुलांच्यामधील भागात असणार्या जागेतून सिमेंटचे कठडे तोडून, तसेच महामार्ग विभागाने लावण्यात आलेले सोलर सिग्नल तोडून थेट नदीवरील महामार्गाच्या दोन पुलांमधील अंतरातून तब्बल दोनशे फूट खोल असणार्या नदीत कोसळला. प्रसंगावधानाने चालकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. तो केवळ जखमी झाला आहे.www.konkantoday.com