
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील रघुवीर घाट ढासळू लागल्याने वाहनधारकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील रघुवीर घाट ढासळू लागल्याने वाहनधारकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळ्यात एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या घाटात दररोज शेकडो वाहने व हजारो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, घाटाचा रस्ता हजारो मीटर खोल दरीच्या बाजूने कोसळू लागल्याने वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक ठरू लागला आहे.
घाटामध्ये कोणत्याही ठिकाणी सुरक्षा कठडे, इशारा फलक वा तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.