प्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन नवल टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल.

प्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन नवल टाटा (८६) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब घसरल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार चालू आहेत.त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. रात्री १२ च्या सुमारास, रतन टाटांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर १२.३० ते १ च्या दरम्यान त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांचा रक्तदाब वेगाने कमी होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हालवलं. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला हे रतन टाटांवर उपचार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button