देव तारी त्याला कोण मारी 9 महिन्याचा चिमुकला, गळ्याला साप चावला, 20 दिवसाच्या बेशुद्धीनंतर आला शुद्धीवर.

गणेशोत्सवासाठी जाधव कुटुंब नवी मुंबईहून कोकणात आपल्या गावी आलं होतं. चिपळूणच्या दुर्गवाडी इथं त्यांचे गाव आहे. गावाला येताना त्यांच्या बरोबर नऊ महिन्याचा चिन्मयही होता. मात्र ऐन उत्सवाच्या काळात एक भयंकर घटना घडली. चिन्मय झोपेत असताना त्याच्या गळ्याला मण्यार हा अत्यंत विषारी साप चावला. त्यात चिन्मय पुर्णपणे बेशुद्ध झाला. घरच्यांची एकच धावपळ उडाली. त्याता तातडीने डेरवणच्या वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या वेळी त्याला रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्याच्या अंगात ताकदच नव्हती. अशा स्थितीत त्याला ॲडमीट करण्यात आले.चिन्मयच्या गळ्याला मण्यार साप चावला होता. त्यामुळे तो पूर्णपणे बेशुद्ध पडला होता. त्याचा श्वासही थांबला होता. त्यांच्या हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली होती. अशा अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. चिमुकल्याला व्हेंटिलेटर लावण्यात आला. पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ.अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले.उपचार सुरू झाल्यानंतर अनेक दिवस हे बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. त्यामुळे सर्वच जण चिंतेत होते. मुलाची प्रकृती गंभीर होत चालली होती. त्याच वेळी त्याला भारत सीरमच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण 30 कुप्या त्याला देण्यात आल्या. तरीही सुधारणा होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनीही अशा सोडली होती. पण देव तरी त्याला कोण मारी, दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले. आपल्या आईला सुद्धा ओळखू लागले.जवळजवळ पाऊण महीना हे बाळ निपचीत पडून होते. 20 दिवसांनंतर पूर्णपणे हे बाळ शुद्धीत आले. बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. असा वेळी त्याचा पाठीला जखमा होवू नये याची काळजी घेण्यात आली होती. बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला. रुग्णालयातील बालरोग विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव वाचवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button