स्नेहज्योती अंध विद्यालयाचे माध्यमातून उत्तम दर्जाचे व जागतीक मान्यता प्राप्त असलेले सँनिटरी पँड निर्मीतीचा प्रकल्प.
कोकणातील ग्रामिण भागातील महिला व मुलिंच्या स्वच्छता व आरोग्य विषयक समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयाचे माध्यमातून उत्तम दर्जाचे व जागतीक मान्यता प्राप्त असलेले सँनिटरी पँड निर्मीतीचा प्रकल्प विद्यालयात साकारत आहे.याची पुर्वतयारी सुरु झाली असून 6 व 7 ऑक्टोंबर 2024 रोजी पँड बनवण्यासाठीची आवश्यक असलेल्या व विद्यालयात बसवण्यात आलेल्या मशनरीची टेस्टीग करण्यात येणार आहे. प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर यातून विद्यालयातील अंध विद्यार्थीनी व परिसरातील महिलांना रोजगाराच्या खुप मोठ्या संधी या प्रकल्पाचे माध्यमातून उपलब्घ होणार आहेत.जागतीक आरोग्य संघटनेने गौरविलेल्या पँड वुमन सौ. स्वाती बेडेकर या प्रकल्पाकरिता स्वताः प्रशालेस मार्गदर्शन करीत असून त्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन व दोन दिवसांचे प्रशिक्षण होणार आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी घराडी येथे ना नफा तोटा या भावानेने समाजाच्या सेवेत रुजू होणाऱ्या या प्रकल्पास चालना दिली असून आपल्या आई श्रीमती रजनीताई तेंडुलकर यांच्या नावे या प्रकल्पास देणगी रुपाने अर्थसहाय्यकेले असून पँड वुमन स्वाती बेडेकर यांनी प्रकल्पसाठी लागणारी मशनरी रॉ मटेरीयल तांत्रीक माहीती व प्रशिक्षण पुरवले आहे व ताई स्वतःहा दोन दिवस घराडी येथे मशीन कशी हाताळावी पँड कसे तयार करावेत याचे प्रशिक्षणास उपस्थित राहणार आहेत अंध मुली व महिलांना प्रशिक्षणही देणार आहेत. ग्रामिण भागातील महिलांचे आरोग्य रक्षण करणे हा या प्रकल्पाचा मुळ उद्देश आहे. या प्रकल्पामुळे विद्यालयातील अंध मुलिंना रोजगार निर्माण होण्यासह महिलांचे आरोग्य रक्षणासाठी कोकणातील ग्रामिण व दुर्गम भागात विधायक व मोठे काम उभे राहणार आहे.या प्रकल्पाविषयी माहीती व प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक महिला व युवतींनी 6 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता स्नेहज्योतील अंधविद्यालय घराडी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन यशस्नेहा ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. आशा कामत यांनी संस्थेच्यावतीने केले आहे.