
आंबा बागायतदारांच्या विमाबाबत लवकरच मंत्रालयस्तरावर बैठक मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
आंबा बागायतदारांचे विमा नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकार्यांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नीतेश राणे यांनी देवगड येथे झालेल्या बैठकीत दिले.बागायतदार शेतकर्यांच्या सर्व प्रश्नांना महायुती सरकार न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघाच्यावतीने आंबा, पिकविमा आदी प्रश्नांबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी इंद्रप्रस्थ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार अॅड.अजित गोगटे, फळबागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रूमडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक-नवरे, तहसीलदार रमेश पवार, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, प्रकाश राणे, डॉ.अमोल तेली आदी उपस्थित होते.