मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला.
मुंबईतील शिवडी परिसरात असलेल्या भारत इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री आगीची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या आगीच्या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही आणि आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.