तो व्हायरल व्हिडिओ गोव्यातील नव्हे तर नायजेरियातील
. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 300 प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. हा व्हिडीओ गोव्यातील असल्याचा नेटकऱ्यांचा दावा होता.पण हा व्हिडीओ गोव्यातील नसून मध्य नायजेरियातील नायजर राज्यातील असल्याचा समोर आलंय. या राज्यातील एका नदीत 300 प्रवाशांनी भरलेली अचानक उलटली आणि त्यात 78 जणांना जलसमाधी मिळालीय.सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राज्य व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख अब्दुल्लाही बाबा-अरह यांनी सांगितलं की, शनिवारी आणखी 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. ही बोट इस्लामिक उत्सवातून 300 हून अधिक लोकांना परत आणत होती. मात्र त्यानंतर अचानक ती नदीत उलटली आणि त्यातून प्रवास करणारे प्रवासी पाण्यात बुडाले.