
ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप.
विधानसभा निवडणुकीच्या घोषणे आधीच गुहागरचे ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यामध्य आरोप प्रत्यारोप सुरू आहे. विनय नातू यांच्या साडी वाटपाच्या कार्यक्रमात महिलांचा अपमान होत असताना नातू हसत होते, असा आरोप भास्कर जाधवांनी करत ते विकृत असल्याचा हल्लाबोल केला.भास्कर जाधव म्हणाले, ‘विनय नातूंना लोक सभ्य समजतात, सज्जन समजतात सुसंस्कृत समजात. पण निवडणूकीला तोंड फूटू दे विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृती किती आहेत, हे मी महाराष्ट्राला दाखवणार. विकृत माणूस आहे हा विकृत.’मैदानात कोण येतोय तो येऊद्या. आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे यापूर्वी अनेकांनी अनुभवलं आहे यानंतर देखील अनुभवतील, असे म्हणत भास्कर जाधवांनी विनय नातू यांना चॅलेंज दिले. तर, नातू यांनी देखील भास्कर जाधव हे 15 वर्ष आमदार आहेत त्यांनी काय विकास केला? असे म्हणत टीका केली.भास्कर जाधव यांनी विकृत म्हणत केलेल्या टीकेला विनय नातू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘कोणाला विकृत म्हणण्यापूर्वी आपण सभेत किती विकृत बोलतो, आपल्या सभेत किती चुकीचे बोलतो याचाही अभ्यास करायला हवा. शारदा देवीच्या मंदिरात शिवराळ भाषा वापरून धुडगूस घातला. तो त्यांचा विकृत लपवण्यासाठी दुसऱ्याला विकृत म्हणत आहेत, असे प्रत्युत्तर विनय नातू यांनी दिले