शासकीय रूग्णालयामधील सुरक्षारक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालये या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ३२ कर्मचार्यांना मागील पाच सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा असा प्रश्न सतावू लागला आहे. या सुरक्षारक्षकांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांच्या ठिकाणी ४ वर्षापूर्वी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. या सुरक्षा रक्षकांना शासन निर्णयानुसार वेतन न देता त्यात कपात करून तुटपुंजे मानधन दिले जात आहे. सर्व सुरक्षा रक्षक सामान्य कुटुंबातील असून त्यांना उधारी, उसनवार करून संसार चालवावा लागत आहे. www.konkantoday.com