चिपळूणच्या गाळ उपशासाठी आणखी पाच कोटी मंजूर.
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीपात्रातील टप्पा क्रमांक एकमधील उर्वरित गाळ काढण्याच्या कामाच्या प्रस्तावास नुकतीच सुमारे पाच कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आमदार शेखर निकम यांना यश आले. दरम्यान, शहराला पूरमुक्त केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही आमदार निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.आमदार निकम यांनी चिपळूण बचाव समिती व जलसंपदा विभागाच्या सहकार्याने शासन दरबारी पाठपुरावा करून महायुती सरकारच्या माध्यमातून वाशिष्ठी नदी गाळ उपसासाठी वारंवार निधी उपलब्ध करून दिला. मंगळवारी पुन्हा पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल आमदार निकम यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांचे शहरवासियांच्यावतीने आभार मानले आहेत.www.konkantoday.com