
अनियमित धान्य पुरवठ्यामुळे पोषण आहार योजनेचा बोजवारा.
प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पुरवले जाणारे धान्य वेळेत उपलब्ध होत नसल्याने या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. त्यातच गेल्या दोन महिन्याचे पोषण आहाराचे धान्य शाळांना उपलब्ध झाले नसल्याने शाळेतील मुलांना पोषण आहार कसा द्यायचा असा प्रश्न शिक्षक आणि पालकांसमोर उभा ठाकला आहे.एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मुलांमध्ये शाळेचा ओढा वाढावा, दिवसेंदिवस कमी होत चाललेली जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी, कुपोषित मुलांचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने शालेय पोषण आहार ही योजना अंमलात आणली. यासाठी शासनाने धडक नियमावली अंमलात आणली असून मुलांना ठरलेल्या प्रमाणात व वेळेत पोषण आहार न मिळाल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिला आहे. www.konkantoday.com