
’वास्को द गामा-मुजफ्फरपूर’ धावणार २८ ऑगस्टपर्यंत, गणेशभक्तांना दिलासा.
कोकण मार्गावर चालवण्यात येत असलेल्या २० एलएचबी डब्यांच्या वास्को द गामा-मुजफ्फरपूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. एक्सप्रेस २८ ऑगस्टपर्यंत धावणार असल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.या साप्ताहिक स्पेशलला यापूर्वी २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. प्रवाशांच्या मागणीनुसार स्पेशलला २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दर सोमवारी वास्को द गामा येथून सायंकाळी ४ वाजता सुटणारी स्पेशल तिसर्या दिवशी सकाळी १२ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात दर गुरूवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटून तिसर्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहचेल.कोकण मार्गावर स्पेशल थिविम, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आदी स्थानकांवर थांबेल गणेशोत्सवात स्पेशल धावणार असल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत स्पेशलला मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून आतापासूनच करण्यात येत आहे.www.konkantoday.com