रेशन दुकानदारांना चार दिवसात मिळणार कमिशन
रेशन दुकानदारांच्या ५ महिन्यांच्या थकीत कमिशनपैकी तीन महिन्यांची रक्कम जिल्हा पुरवठा विभागाकडे शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे मंगळवारी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी प्रभारी पुरवठा अधिकारी गुरव यांची भेट घेवून ही रक्कम तत्काळ खात्यात जमा करण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आल्याने येत्या चार दिवसात दुकानदारांना पैसे मिळणार आहेत.जिल्हा पुरवठा विभागाने फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै व ऑगस्ट या पाच महिन्यांचे प्रती क्विंटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन दुकानदारांना अद्याप दिलेले नाही. यामुळे दुकानदार अडचणीत आले आहेत.www.konkantoday.com