रत्नागिरीतील आंबा बागायतदारांसमोर गोगलयाईची नवीन समस्या.
रत्नागिरीतील आंबा बागायतदार शेतकर्यांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. कोकणात सध्या काही आंबा बागांमध्ये गोगलगायचा त्रास सुरू झाला आहे. आंबा कलमांवर हल्ला केला जात असल्याचे दिसून आले आहे. याविषयी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले असून लवकरच त्याचे निष्कर्ष जाहीर रण्यात येतील असे यावेळी शेतकर्यांना सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेने बागायतदारांची कार्यशाळा रविवारी श्रद्धा श्राफल्य मंगल कार्यालय टीआरपी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. महेश कुलकर्णी, किटक शास्त्रज्ञ जालगांवकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याला २०० हून अधिक बागायतदार उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे ५० महिला सहभागी होत्या. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव मंदार सरपोतदार उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी भोये यांनी माहिती दिली.www.konkantoday.com