
दापोलीतील सुवर्णदुर्गची युनेस्कोकडून हवाई पाहणी.
संपूर्ण महाराष्टाचे आराध्यदैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने व पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा मिळावा, यासाठी सुरू असणार्या प्रयत्नांना पहिला टप्पा बुधवारी पार पडला. युनेस्कोच्या पथकाने सुवर्णदुर्गची हवाई पाहणी केली व येथील ग्रामस्थांशी आणि अधिकार्यांशी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला.सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीमध्ये नोंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी युनेस्कोची टीम दापोलीमध्ये येवून दाखल झाली होती. त्यानी हेलिकॉप्टरद्वारे सुवर्णदुर्ग किल्ल्याची हवाई पाहणी केली. यानंतर ते पुण्याला रवाना झाले. पुण्याला रवाना झाल्यानंतर दुपारनंतर त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, नगराध्यक्ष नम्रता मोरे, हर्णै सरपंच, उपसरपंच तसेच दापोलीतील विविध क्षेत्रातील मान्यवर व हर्णैमधील काही निवड ग्रामस्थांचा समावेश होता.www.konkantoday.com