जिल्ह्यातील ग्रापंचायतींमध्ये नेमणार नल जल मित्र.
जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी/ प्लंबर, मेकॅनिक/फिटर व इलेक्ट्रीशियन/ पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपापल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरूस्ती योग्य रीतीने व्हावी या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत तीन नल जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. www.konkantoday.com