एसटी अस्वच्छ आढळल्यास आगार व्यवस्थापकांना दंड.
राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी बसमध्ये स्वच्छतेच्यादृष्टीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अस्वच्छ एसटी बस आढळल्यास त्याचा ठपका थेट आगार व्यवस्थापकांवर ठेवत दंडात्मक कारवाईचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.स्वच्छ एसटी स्थानक मोहिमेनंतर आता एसटी बसेस स्वच्छतेसाठी नवीन मोहीम सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. बसच्या स्वच्छतेबाबत महामंडळाने गांभीर्याने ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस आधी पासून एसटी बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. www.konkantoday.com