मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी येथील आयडॉलच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके लवकरच मिळणार. भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी घेतली पदवीधर आ. निरंजन डावखरे यांची भेट.
रत्नागिरी: – गेले अनेक महिने रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात आयडॉलच्या विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण केलेल्या विषयांचे गुणपत्रक उपलब्ध होत नाहीयेत. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राकडे आयडॉल मुंबई कडून गुणपत्रके पाठवली जात नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप होत होता. काही विद्यार्थ्यांनी दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्याकडे धाव घेत सदर प्रश्न मांडला.कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे रत्नागिरी येथे आले असता डॉ.ऋषिकेश केळकर यांनी सदर प्रश्न जिल्हाध्यक्ष राजेश दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निरंजन डावखरे यांच्या जवळ मांडला.सदर विषयाची तातडीने दखल घेत आ. निरंजन डावखरे यांनी थेट मुंबई विद्यापीठ आयडॉल विभागाशी संपर्क साधत सदर विषय त्वरित सोडवून रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके पाठविण्यात यावी अशी विनंती केली दिला. याप्रसंगी दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यासोबत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर विषय योग्यरीत्या हाताळल्याबद्दल व सहकार्य केल्याबद्दल विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांचे आभार मानले. सदर विषयाबद्दल पुढे देखील मी पाठपुरावा करणार असून, विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्र आयडॉल येथे मिळवून देणार असल्याचे तसेच विद्यार्थी-युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे भाजयुमो दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.