
रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सव
रत्नागिरी : जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव होणार असून या महोत्सवामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसह कोकणी मेव्याला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर येथील शेतकर्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकडेे शासनाने लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादकांबरोबरच काजू, कोकम, जांभूळ, फणस व विविध पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवणे हे उद्दिष्ट आहे.