अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित; प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कर महाराष्ट्र राज्य सरकारने गुरुवारी २०२२-२३ या वर्षाच्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा केली. भारताचा धावपटू अविनाश साबळे याला पुरस्कार जाहीर केला गेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीची फानयल गाठून इतिहास घडवला होता. त्याने पॅरिसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला, परंतु पदकापासून तो दूर राहिला. २०२२-२३ चा जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जाहीर झाला आहे.
* प्रदीप गंधे यांनी १९८२ च्या आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरी व पुरुष सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाला देण्यात येणाऱ्या जिजामाता पुरस्कारासाठी पवन भोईर( जिम्नॅस्टिक्स ), अनिल भोईल ( कबड्डी), शुभांगी रोकडे ( तिरंदाजी), राजाराम घाग ( दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक), दिनेश लाड ( क्रिकेट) व सुमा शिरूर ( नेमबाजी) यांची निवड केली गेली आहे. *शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ ( खेळाडू )*अविनाश साबळे, दीप रामभीया, निलम घोडके, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील, कशीश भराड, गिरीश काते, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे, चितारा विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, याश्वी शाह, सुह्रद सुर्वे, दिया चितळे, श्रेयस वैद्य, श्रुती कडव, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वी पाटील, अंकित जगताप, पंकज मोहिते.प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे