रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेलीदोन प्रतीक्षालय कक्ष बंद.
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभारा बाबत वारंवार तक्रारी येतात मात्र, आता रुग्णालयाला नवे जिल्हा शल्यचिकित्सक मिळाल्याने ढिसाळ कारभारात सुधारणा होत आहेत. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दोन प्रतीक्षालय कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, ते बंद अवस्थेत असल्याने नातेवाईकांना आराम किंवा बसण्यासाठी बाहेरील आंब्याच्या झाडाचा आसरा घ्यावा लागत आहे. तसेच काही नातेवाईक वॉर्डच्या बाहेर लादीवर बसून राहतात. परंतु, नातेवाईकांसाठी नव्या इमारतीत तयार करण्यात आलेल्या जिन्याच्या दोन्ही बाजूच्या प्रतीक्षालय कक्षांना साखळीचे कुलूप लावल्याचे पाहायला मिळत आहे.रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निर्माण केलेली दोन्ही प्रतीक्षालय कक्ष बंद ठेवण्यात आली आहेत. एका प्रतीक्षालय कक्षात चक्क सामान भरून ठेवण्यात आले आहे तर दुसर्या प्रतीक्षालय कक्षात बैठक व्यवस्था असूनही ती खोली कुलूप लावून बंद ठेवण्यात आली आहे.