रत्नागिरीतील ‘बाल्को’ प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मोर्चा.
रत्नागिरीतील ‘बाल्को’ प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी येथे सनदशीर मार्गाने या प्रकल्पग्रस्तांनी लढा सुरू ठेवला आहे, पण अजूनही त्यांच्या मागणीचा तिढा सुटत नसल्याने मंगळवारी देखील पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेती अवजारांसह मोर्चा काढला.सन 1967 साली संपादित केलेल्या शिरगाव-चंपक मैदान परिसरातील सुमारे 1200 एकर जमिनीवर कोणताच प्रकल्प उभा राहिला नाही. मुळ मालकाकडून ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आली असून, ही जमीन शेतकर्यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी देखील प्रकल्पग्रस्तांनी परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.