मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीची नेमणूक
विमान प्रवासादरम्यान आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या एअर होस्टेज असतात. आता अशाच हवाई सुंदरी ई-शिवनेरी बसमध्ये देखील दिसणार आहे. एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्यात येणार आहे. एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत ही घोषणा केली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.