दिल्लीच्या कर्तव्यपथावर राजापूर सुकन्येचे भरतनाट्यम*

  • _अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकाराच्या सादरीकरणात राजापुरातील भरतनाट्यम नृत्यांगना शांभवी दाते हिची निवड करण्यात आली होती. तिच्या या कर्तृत्वाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या कर्तव्यपथावर ऐकिहासिक असा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध नृत्य प्रकारांसाठी देशभरातून सुमारे १ हजार ५०० मुली सहभागी झाल्या होत्या. यावर्षी नारीशक्ती ही विशेष थीम असल्याने मुलींचा सहभाग हा लक्षीय स्वरूपाचा होता. या कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूरची सुकन्या व सध्या पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या शांभवी दाते हिची पुण्याच्या ग्रुपमधून निवड झाली होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button