
माळशेज घाटात दगड कोसळून पर्यटकाचा मृत्यू
पुण्यातील तरूणाचा माळशेज घाटात डोक्यावर पडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी माळशेज घाटात ४८ पर्यटक आले होते. घाटात फिरत असताना अचानक घाटावरून ४ ते ५ मोठ्या दगडी खाली पडल्या. एक दगड पर्यटकाच्या डोक्यात पडला. तो खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या तरूणाला खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा जागीच उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
हेमंत कुमार सिंग (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. काल सायंकाळच्या सुमारास पुण्याहून माळशेज घाटात फिरण्यासाठी ४८ पर्यटक आले होते. माळशेज घाटातील थीतबी या ठिकाणी पर्यटक फिरत होते. यावेळी चार ते पाच दगडी डोंगरावरून खाली रस्त्यावर पडल्या. दगडी आकाराने मोठ्या होत्या.यामुळे पर्यटकांची धावधाव झाली. यावेळी एक मोठा दगड हेमंत कुमार सिंग या तरूणाच्या डोंगरावर पडला. यामुळे तरूण क्षणात रक्तबंबाळ होत खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या तरूणाला तातडीने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. तरूणाच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला मुरबाड येथील रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.