
बावीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने झोपेतच मृत्यू
सध्या तरुणांमध्येही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलं आहे. धावपळीच्या युगात जीवनशैलीची अनेक परिमाणे बदलली आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना दापोली शहरात घडली आहे. दापोली शहरात. एका 22 वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात राहणारा सुजल संतोष तळवटकर असं या तरुणाचं नाव आहे. नेहमी आपल्या व्यवसायात मदत करणारा मेहनती असलेला महाविद्यालयात शिक्षण घेणारा कर्ता मुलगा कुटुंबाने गमावला आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुजल हा आपल्या आई-वडिलांच्या भाजी व्यवसायात मदत करत असे. नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकीमध्येही तो आदल्या दिवशी आनंदाने सहभागी झाला होता. मिरवणुकीवरून घरी आल्यानंतर रात्री काही वेळ मोबाईल बघून तो झोपी गेला. मात्र, सुजल रात्री झोपला त्याचा झोपेतच मृत्यू झाला




