
25 मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न सध्या वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.त्यानुसार 25 मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होईल, अशी माहिती एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच, जे विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार आहेwww.konkantoday.com