
आद्य जगद्गुरु रामानंदचार्य व गजानन महाराज प्रकट दिन सोहळा कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती* *८१ हजार रक्त बॉटल जमवून रक्तदात्यांचा रिकॉर्ड नरेंद्रचार्य महाराजानी तोडले:- पालकमंत्री उदय सामंत
आज राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आद्य जगद्गुरु रामानंदचार्य व गजानन महाराज प्रकट दिन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहून जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी नाणीज संस्थान च्या कार्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कौतूक केले.जगद्गुरुच्या माध्यमातून महाराष्ट्रमधून ८१ हजार रक्त बॉटल जमवून रक्तदात्यांचा रिकॉर्ड नरेंद्रचार्य महाराजानी तोडले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमा निमित्ताने केले.जगद्गुरुच्या रक्तदान शिबिराचा वर्ड रिकॉर्ड झाला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.जगद्गुरुचे नाणीज पीठ हे आता फक्त देशापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य रक्तदान समितीने महाराजाचा सन्मान केला त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून मी उपस्थित राहिलो हे मी भाग्याचा दिवस समजतो. अनेक सामाजिक काम संस्था च्या माध्यमातून होत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याचे कौतूक केले. यावेळी व्यापीठावर जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज, कानिफनाथ महाराज, रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हास घोसालकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, डॉ. महेंद्र केंद्रे, विभाग प्रमुख तात्या सावंत, माजी उपसभापती उत्तम सावंत, नाणीज सव सुनील ठाकूर, सेक्रेटरी चंद्रकांत नाईक, तसेच नाणीज संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, तसेच महाराष्ट्रतुन आणि इतर राज्यातून हजारोच्या संख्येत भक्त गण उपस्थित होते.www.konkantoday.com