
जयगड, दाभोळ, बाणकोट व दिघी फेरीबोटींना सुरूवात
राज्य मेरीटाईम बोर्डाने सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत कोकणातील जयगड, दाभोळ, बाणकोट व दिघी या चार खाड्यांमध्ये फेरीबोटी सुरू करण्यास दिली आहे. कोरोना संसर्गाच्यामुळे या सर्व फेरीबोटी बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु यामुळे स्थानिक जनतेची मोठी गैरसोय होत होती. यामुळे या फेरीबोटी सुरू करण्याबाबत सुवर्ण शिपिंगचे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल यांनी या फेरीबोटी सुरू करण्याबाबत परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याला आता महाराष्ट्र राज्य मेटीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. कोकणातील छोटे व्यापारी, आंबा बागायतदार, मच्छिमार यांच्या सेवेसाठी सर्व फेरीबोटींना मालवाहतुकीची परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र मोकल यांनी दिले होते. त्यामुळे दोन्ही फेरीबोटींची सेवा सकाळी ७ ते सायं. ७ या वेळात सुरू राहणार आहे.
www.konkantoday.com