सामाजिक कार्यकर्ते खलील वस्ता यांच्या पाठपुराव्यामुळे जनमाहिती अधिकार्याचे फलक न लावणाऱ्या कार्यालयांना तातडीने फलक लावण्याचे जि.प. ने काढले आदेश.
शासनाच्या परिपत्रकानुसार माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये क्षेत्रिय कार्यालयामध्ये आवश्यक असलेले जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाने प्रत्येक कार्यालयाबाहेर फलक लावणे बंधनकारक असताना देखील गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत सोमेश्वर यांनी हे फलक लावले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते खलील वस्ता यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत त्यांनी संबंधितांना विचारणा केली असता त्यांना एका कार्यालयाकडून दुरूत्तरे करण्यात आली होती.वस्ता हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतात त्यामुळे अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी उघड केली आहेत. सदर कार्यालयाकडून दुरूत्तरे झाल्यानंतर वस्ता यांनी बाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र लिहून संबंधित कार्यालयांना जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याची सूचना देण्यात यावी व हे फलक न लावलेल्या या कार्यालयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे पत्र दिले होते. या पत्राची दखल जिल्हा परिषदेने तातडीने घेतली असून त्यांनी जिल्हापरिषदेच्या सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना तातडीने पत्र लिहून माहिती अधिकार्याचे फलक तातडीने लावावेत असे पत्र दि. १३.९.२०२४ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असून त्याची तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे फलक लावणार्या टाळाटाळ करणार्या कार्यालयांना चांगलाच जरब बसणार आहे. www.konkantoday.com