लांजातील प्रगतशील शेतकरी श्रीपती धनावडे यांचे निधन.
लांजातील प्रगतशील तसेच शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रीपती नरसु धनावडे (६८) यांचे २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले.लांजा शेतीशाळेतून शिक्षण पूर्ण करून डोंगरामध्ये शेती करण्यासाठी धनावडे यांनी नारळ, आंबा, काजू, केळी यांची बाग फुलवली.शेतीला जोडधंदा म्हणून पालेभाजी व नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. कोकणात नर्सरीची सुरूवात करण्यात त्यांचा मोठा वाटा असून धनावडे यांचा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते कृषीभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. .www.konkantoday.com