
राष्ट्रवादीच्या स्टाईक रेटने उद्धव ठाकरे प्रेशरखाली, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे मत.
लोकसभा निवडणुकीत मविआत लोकसभेच्या सर्वाधिक जागा असल्याने आणि शरद पवार यांचा सर्वाधिक स्ट्राईक रेट असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडेसे प्रेशरखाली आले आहेत असे दिसत आहे, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.दरम्यान, भास्कर जाधव म्हणाले की, हे विधान जबाबदारीने केले आहे. माझ्यासाठी राजकीयदृष्ट्या हे अडचणीचे आहे. पण उद्धव ठाकरे यांनी प्रेशर खाली येण्याची गरज नाही. आज महाराष्ट्राला तुमच्यामुळेच महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या हे महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्यामुळेच या जागा मिळाल्या आहेत.www.konkantoday.com